
बातमी कट्टा:- रागाच्या भरात घरातून बेपत्ता झालेल्या युवकाचा आज सकाळच्या सुमारास तापीनदीपात्रात मृतदेह तरंगतांना आढळून आला आहे.यापुर्वी युवक बेपत्ता असल्याची पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली होती. घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 22 रोजी 2022 रोजी पासून शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथील विनोद सुरेश परदेशी हा 25 वर्षीय युवक रागाच्या भरात घरातून बेपत्ता झाला होता.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात विनोद परदेशी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. त्याचा सर्वत्र शोध घेणे सुरु होते.तो कुठेही मिळुन आला नव्हता मात्र आज दि 27 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास गिधाडे तापीनदी पात्रात त्याचा मृतदेह तरंगातांना आढळून आला.तर्हाडी येथील ग्रामस्थांना माहिती मिळताच घटनास्थळी तुळशीराम भामरे,सरपंच सुनिल धनगर युवराज भलकार यांच्यासह ग्रामस्थ गिधाडे तापी पुलावर दाखल होऊन मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढण्यात आला आहे. याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
