
बातमी कट्टा:- भरधाव स्कॉर्पिओ वाहनाला पोलीसांनी थांबवून तपासणी केली असता त्या स्कॉर्पिओ चारचाकी वाहनात चक्क 89 तलवारी व एक खंजीर मिळुन आल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे.याबाबत चारही संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 27 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलींग करत असतांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर मध्यप्रदेश राज्याकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणारी एम एच 09 सिएम 0015 क्रमांकाची स्कॉर्पिओ वाहन पोलीसांना दिसून आली.पोलीसांना संशय गेल्याने स्कॉर्पिओ थांबवण्याचा ईशारा दिला मात्र स्कॉर्पिओ न थांबता भरधाव वेगाने पुढे चालवून नेली.पोलीसांनी त्या स्कॉर्पिओ वाहनाचा पाठलाग करत तीला थांबवली व विचारपूस केली असता वाहनातील चार ही संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.चारही जणांंना स्कॉर्पिओ चार चाकी वाहनातून खाली उतरवून वाहनाची तपासणी केली असता त्यात चक्क 89 तलवारी व एक खंजीर आदी मिळुन आले.
पोलीसांनी संशयितांना नावाची विचारपूस केली असता मोहम्मद शरीफ मोहम्मद शफिक वय 35 ,शेख इलीयास शेख लतिफ वय 32,सैय्यद नईम सैय्यद रहिम वय 29,व कपिल विष्णु दाभाडे वय 35 असे नावे सांगितले पोलीसांनी चारही संशयितांना ताब्यात घेत सोनगिर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई सोनगीर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, श्यामराव अहिरे,ईश्वर सोनवणे,सुरज साळवे आदींनी केली आहे.
