बातमी कट्टा:- नेहमी प्रमाणे कॉलेजात गेलेला असतांना दुपारी मित्रांसोबत जेवायला बसत असतांना अचानक चक्कर येऊन पडल्याने 18 वर्षीय युवकाचा धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली आहे. घटनेची माहिती गावात पसरताच गावात हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील जयेश पावजी धनगर वय 18 हा नेहमीप्रमाणे आज दि 3 मार्च रोजी कॉलेजला गेला होता.दुपारी 12 वाजेच्या सुमारास जयेश मित्रांसोबत जेवायला बसत असतांना अचानक चक्कर येऊन तो पडल्याने त्याला तात्काळ प्राध्यापक नितीन बोरसे यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जयेशची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचारासाठी त्याला धुळ्याला हलवण्यात आले. धुळे येथे उपचारादरम्यानच जयेशचा मृत्यू झाला.
जयेश हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात आर सी पटेल पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेत होता. जयेशचे वडील पावजी धनगर हे कुरखळी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. मयत जयेशच्या पश्चात आई- वडील व एक बहीण असा परिवारात होत.जयेश हा घरातील एकुलता एक मुलगा होता. घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. त्याच्यावर दि 4 मार्च रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास कुरखळी येथून अंत्ययात्रा निघणार आहे.