बातमी कट्टा:- त्याच्या सोबत प्रवास करुन त्याचा खूनाचा प्लॅन करत दोघांनी त्याला संपवले,त्याच टँकरच्या कॅबिन मध्ये त्याचा मृतदेह ठेऊन टँकर चालवत धुळे जवळ आणून त्याचा मृतदेह रस्त्याच्या कड्याला फेकत तेथून टँकर पुढे घेऊन जात त्यातील संपूर्ण गॅस विक्री करुन 1 लाख 30 हजार रुपये घेऊन टँकर सोडले व तेथून दोघेही जणांनी इंदौर गाठत आप -आपल्या ठिकाणी फरार झाले.या संपूर्ण फिल्मी स्टाईल खूनाचा पोलिसांनी शिताफीने छडा लावत वेशांतर करुन त्यातील एकाला उत्तरप्रदेश राज्यातून ताब्यात घेतले आहे.

धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल होता. दि 29 जून रोजी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील पश्चिमेस पुरमेपाडा ता.धुळे शिवारात रुईच्या माथ्यावर शिवशक्ती हॉटेल ते शिवशाही हॉटेलच्या मध्यभागी गवतात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता याबाबत पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्या मृतदेहाचा शोध घेतल्यानंतर सदर मृतदेह मिर्झा आझाद बेग वय 30 हा टँकर चालक म्हणून होता अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.मात्र त्याचा हा मृतदेह येथे कोणी फेकला,खून कोणी केला याबाबत काही एक माहिती प्राप्त झालेली नव्हती. अखेर धुळे तालुका पोलिसांनी कसून शोध घेत अखेर मिर्झा बेग या खून करणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे.
मिर्झा आझाद बेग वय 30 हा हरशसनसिंग भाटीया यांच्या मालकीचे एम.एच 04 एच.एस 1289 या टँकर वर काम करत होता.याच टँकर वर पुर्वी काम करणाऱ्या नफीस अहमद मुहमद ईशा वय 36 व क्लीनर इम्रान खान उर्फ नौशाद अली वय 30 हे दोनही जण दि 29 जून रोजी टँकर मध्ये चालक मिर्झा बेग सोबत बसून सुटीवर राहते गावी जात होते. प्रवासादरम्यान दोघांनी ईगतपुरी या ठिकाणी दारु प्राशन केली व यावेळी टँकर चालकाचा खून करुन टँकरमधील गॅस विक्री करण्याचा कट रचला.

त्याचप्रमाणे दोघांनी संगमताने मालेगाव च्या पुढे टँकर आल्यानंतर मिर्झा बेग यांना टँकर थांबवायला लावला त्यानंतर दोघांनी मिर्झा बेग सोबत भांडण उरकुन काढले व त्यांनी शिवीगाळ करत आसतांना मिर्झा बेग याने टँकर चालु करण्यापुर्वी टँकरचा आरशा कागदाने पुसत असतांना इम्रान खान उर्फ नौशाद अली याने टँकरच्या कॅबिन मध्ये असलेल्या टुलबॉक्स मधील व्हिलपान मिर्झा बेग याच्या डोक्यावर मारला त्यानंतर नफीस अहमद मोहमद ईशा याने गळ्यातील बागायती रुमालाला पिळ घालत मिर्झा बेग याचा गळा आवळला.यात मिर्झा बेग याचा मृत्यू झाला त्यानंतर मृतदेह टँकरमधील कॅबिनच्या एका बाजुला ठेऊन संशयित नफीस अहमद मोहमद ईशा याने टँकर चालवत मिर्झा बेग यांचा मृतदेह धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पुरमेपाडा येथील गावाच्या शिवारात रस्त्याच्या कडेला फेकुन दिला त्यानंतर संशयितांनी पुढे टँकर नेत टँकरमधील 5060 किलो ग्रँम गॅस विक्री करत पंप मँनेजर कडून 1 लाख 30 हजार रुपये घेऊन चाळीसगाव रोड वरील माडगुळकर पंप येथे उभा केला व त्यानंतर दुसऱ्या टँकर मध्ये बसून चाळीसगाव चौफुली येथे आले व तेथून खाजगी बसद्वारे इंदौर पर्यंत एकत्र गेले व तेथून दोघेही वेगवेगळ्या मार्गाने निघुन गेले.
धुळे तालुका पोलीस स्टेशनचे स.पो.निरीक्षक प्रशांत गोरावडे,प्रविण पाटील,नितीन दिवसे,अमोल कापसे या पथकाने वेष बदलून संशयित नफीस अहमद मोहम्मद इशा याला उत्तरप्रदेश राज्यातील उडैयाडीह जिल्हा प्रतापगड येथे जाऊन ताब्यात घेण्यात आले आहे.सदर कामगिरी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय अधिकारी साक्री प्रदीप मैराळे,पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे,प्रविण पाटील, नितीन दिवसे,अमोल कापसे यांन पार पाडले.