द बर्निंग कारचा थरार,कार जळून खाक…

बातमी कट्टा :- चालत्या चारचाकी वाहनाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना आज दि 20 रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.शिंदखेडा दोंडाईचा रस्त्यावर द बर्निंग कारचे दृश्य बघावयास मिळाले आहे.यात कार पुर्णपणे जळून खाक झाली आहे.

शिंदखेडा -दोंडाईचा रस्त्यावरून चारचाकी कार घेऊन जात असतांना चिलाने गावाजवळ आज दि 20 रोजी रात्री अचानक चालत्या चारचाकी कारला आग लागल्याची घटना घडली.आग लागल्याचे लक्षात येताच तात्काळ चालकाने कार रस्त्याच्या बाजूला घेऊन उभी केली व चालक बाहेर पडला.त्यानंतर संपूर्ण कार जळून खाक झाली.सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

शॉर्टशर्कीटमुळे कारला आग लागल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.रात्रीच्या अंधारात आगीचे लोठ बघावयास मिळताच नागरिकांनी धाव घेतली.या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.रात्रीच्या सुमारास घटना घडल्याने अधिक माहिती प्राप्त होऊ शकले नाही.

WhatsApp
Follow by Email
error: