
बातमी कट्टा:- अपघात होऊन भरधाव ट्रक पलटी झाल्याने अचानक ट्रकला आग लागल्याने संपूर्ण ट्रकससह पॉली प्रोपोलीन जळून खाक झाल्याची घटना आज दि 6 रोजी दुपारच्या सुमारास घडली.वेळीच ट्रक चालकाने ट्रककॅबिन बाहेर उडी मारल्याने जिवीत हानी टळली आहे.

साक्री तालुक्यातील दहिवेल येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सुरतकडून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकचा आज दि 6 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास साईबाबा पंप जवळ ट्रक पलटी झाल्याने अपघात झाला.ट्रक पलटी होताच ट्रकने पेट घेतला.काही क्षणातच आगीने भडका घेतल्याने ट्रकसह ट्रक मधील पॉली प्रोपोलीन जळून खाक झाला.ट्रक चालकाने तात्काळ ट्रक बाहेर उडी मारल्याने जिवीत हानी टळली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले.उशीराने अग्निशमन बंब घटनास्थळी दखल झाल्याने संपूर्ण ट्रक व ट्रक मधीर साहित्य जळून खाक झाले होते.
