
बातमी कट्टा: शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी धुळे येथे खाजगी रुग्णालयात जाऊन सांगवी येथील दुर्घटनेतील तिन गंभीर जखमींची सहानुभूतीपूर्ण चौकशी केली.
सांगवी येथील दंगलीच्या घटनेत गेल्या आठवड्यात मन्या लक्ष्मण भिल, सुभाष भील व शिवदास भील या तिघांवर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची सहानुभूतीपूर्ण विचारपूस करण्यासाठी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा हे 14 ऑगस्ट 2023 सोमवार रोजी दुपारी धुळे येथे गेले. तीनही गंभीर रुग्णांची विचारपूस करून त्यांच्यावर पुढील उपचार होण्यासाठी सर्व रुग्णांना मुंबई येथे पाठविण्याबाबत माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याशी चर्चा केली.
यावेळी आमदार काशिराम पावरा यांच्यासह धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती कैलास पावरा, सांगवी येथील जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल हे उपस्थित होते.
तीनही गंभीर रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यासाठी प्रयत्न सुरु असून सर्व नियोजन भूपेशभाई पटेल हे करीत आहेत.