नंदुरबार बातमी कट्टा :कोविड-19 या रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परिक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव सवलतीचे गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.
वाढीव ग्रेसगुणासाठी सन 2020-2021 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वीसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 8 वी व 9 वी मध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येईल. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 12 वी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 11 वी मध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2020-2021 मध्ये क्रीडा गुणांची सवलत देण्यात येणार आहे.
खेळाडूंच्या वाढीव ग्रेस गुण मागणीसाठी प्रत्येक खेळाडूंचा उच्चत्तम कामगिरी केलेले प्रमाणपत्र जोडून स्वतंत्र प्रस्ताव तयार करुन 2 प्रतीत 25 जून 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.