दि 28 ऑक्टोबर रोजी शक्तीप्रदर्शनासह आ.काशिराम पावरा करतील नामांकनपत्र दाखल

बातमी कट्टा:- हजारोच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शनासह 28 ऑक्टोबर रोजी शिरपूर विधानसभा मतदारसंघासाठी आमदार काशिरामदादा पावरा यांचे नामांकनपत्र दाखल करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह भाजपा व महायुतीचे अनेक पदाधिकारी तसेच शिरपूर तालुक्यातील हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत 28 ऑक्टोबर 2024 रोजी आमदार काशिराम दादा पावरा यांची उमेदवारी दाखल केली जाणार आहे. 

आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या ग्राउंडवर 28 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: