बातमी कट्टा:-दोंडाईचा ता. शिंदखेडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 जागांसाठी आज दि 29 रोजी सकाळी नऊ वाजेपासून शिंदखेडा येथील काकाजी मंगलकार्यालय येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 16 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात होते.यात हमाल व तोलारी मतदारसंघातून जयकिसान पॅनलचे उमेदवार एकनाथ कथ्थु सोनवणे (नाईक) हे विजयी झाले.