
बातमी कट्टा:- पोलीसांचे गस्ती पथक गस्तीवर फिरत असतांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एक ईसम संशयितरित्या उभा असल्याचे दिसून आले.पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे दोन पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे मिळून आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोसई भिकाजी पाटील, कैलास जाधव,सईद शेख,संतोष पाटील, योगेश मोरे,कृष्णा पावरा आदी जण दि 31 रोजी गस्तीवर असतांना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वरील विनायक ढाबा समोर एक ईसम बॅग घेऊन उभा होता. पोलीस पथकाला त्याच्यावर संशय आल्याने त्याची विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता त्याच्याकडील कॉलेज बॅगची तपासणी केली असता त्यात दोन गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे आणि मोबाईल पोलीसांना मिळुन आला.

पोलीसांनी त्यावे नाव विचारले असता प्रयागसिंग देवीसिंह वय 27 रा.राजपूत बस्ती मुर्जगढ ता.पोकळण जि.जैसलमेर राजस्थान असे सांगितले पोलीसांनी 40 हजार किंमतीचे दोन गवाठघ पिस्तूल 2,500 किंमतीचे जिवंत काडतुसे व 200 किंमतीचा मोबाईल जप्त करत संशयिताला ताब्यात घेतले आहे. संशयिताकडून अधिक विचारपूस करण्यात येत आहे.
