बातमी कट्टा:-बँकेचे एटीएम मशीन फोडून तब्बल 36 लाखांची रक्कम चोरट्यांनी लांबविल्याची धक्कादायक घटना आज भर दुपारी उघडकीस आली आहे.तब्बल 36 नंतर पैसे चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.दि 12 रोजी मध्यरात्री सदर चोरी झाली होती.एटीएम बंद झाल्याचा संदेश संबंधित एटीएम अधिकारीला प्राप्त झाला होता मात्र याकडे दुर्लक्ष केले होते तर चोरट्यांनी एटीएमचे शेटर बंद केल्याने शनिवारी दिवसभर एटीएम मशीनकडे कोणीही फिरकले नाही.रविवारी एटीएम दुरुस्तीसाठी आलेल्या व्यक्तीला चोरी झाल्याचे समजल्याचे समजले.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा शहरातील शिरपूर रोड लगत स्टेट बँक जवळील बँकेचे एटीएम मशीन येथे शुक्रवार दिनांक 12 रोजी मध्यरात्री अज्ञात संशयितांनी एटीएम मशीन फोडून 36 लाख 86 हजार 500 रुपये चोरी केल्याचे आज समजले.चोरी केल्यानंतर चोरट्यांनी एटीएम मशीनचे शेटर बंद केले.यामुळे मशीनकडे कोणीही फिरकले नाही.अज्ञात संशयितांनी बँकेचे तीन सी.सी टी.व्ही कॅमेरा पैकी एकावर स्प्रे मारला होता.तर इतर दोन कॅमेरांचे वायर तोडून बंद करण्यात आले.तर अलार्मच्या वायरी देखील तोडल्याचे दिसून आले.
सदर घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एटीएम मशीन बंद असल्या बाबतचा मेसेज शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना आलेला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित अधिकाऱ्यांना आज रविवारी सकाळी पुन्हा मॅसेज आल्यामुळे एटीएम मशीन दुरूस्तीसाठी शिंदखेडा स्टेट बँकेच्या या मशीन येथे अविनाश पगारे हे आले तेव्हा त्यांना एटीएम मशीनचे लोखंडी बॉल्ड तोडून,आतील कॅशीट डॉवर मधील 36 लाख 86 हजाराच्या 500 दराच्या 7 हजार 373 चलनी नोटा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शनिवारी बँकेला सुट्टी होती तर एटीएम मशीनचे शटर बंद असल्याशे कोणीही याकडे लक्ष दिले नाही. सदर चोरट्यांनी एका सी.सी.टी.व्ही कँमेराला स्पे मारला आहे तर दोन ते तीन सीसीटीव्ही कँमेराचे वायर तोडण्यात आल्याचे दिसुन आले आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत शोध कार्य सुरु केला आहे.