धरणात पोहायला गेलेल्या दोघा मित्रांचा बुडून मृत्यू

बातमी कट्टा:- मुक्त विद्यापीठाची शेवटची परिक्षा आटोपून मित्रांसोबत धरणात पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दि 7 रोजी घडली आहे.

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पोहायला गेलेल्या 2 विद्यार्थ्यांचां पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मुक्त विद्यापीठाचा काल दि 7 रोजी शेवटचा पेपर होता. तो पेपर आपटून दहा विद्यार्थी एकत्र विरचक्क धरणात पोहोण्यासाठी गेले होते. सध्या धरणात पाणीसाठा कमी झाला असून मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे दोन विद्यार्थ्यांच्या गाळात पाय फसून मृत्यू झाल्याची घटना घडली.जिजामाता महाविद्यालय येथील मुक्त विद्यापीठात दोन्ही विद्यार्थी शिक्षण घेत होते.दिपक सुनील वाकडे वय 20 आणि कल्पेश भगवान सोनवणे वय 20 या दोघांचा मृत्यू झाला असून या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

WhatsApp
Follow by Email
error: