धुळे आगारातून सुटली अन् पुढे अज्ञातांकडून फुटली…

बातमी कट्टा:- एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात गेल्या 14 दिवसांपासून बससेवा पुर्णता बंद झाले होते.जिल्ह्यातील आगारात सुकसुकाट बघावयास मिळत होता.आज पोलीस प्रशासानच्या बंदोबस्तात धुळे आगारतून बससेवा सुरु करण्यात आली मात्र काही वेळेनंतर त्या एसटींवर अज्ञात्यांकडून दगडफेक करण्यात आले असून यात एक चालक जखमी झाले आहेत.

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गेल्या काही दिवसांपासून लालपरी कुठेही बाहेर पडलेली नव्हती मात्र तब्बल 14 दिवसानंतर पोलिस प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेत धुळे आगारातील बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.आज सकाळी चार बसेस सोडण्यात आल्या होत्या. 

कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसताना, संप सुरू असताना प्रशासनाने आडमुठ्ठपणाची भूमिका न घेता बसेस सुरू करू नये अशी मागणी मनसे कडून करण्यात आली होती तर या वेळी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाविरुद्ध जोरदार घोषणा व निदर्शने करण्यात आल्या होत्या मात्र धुळे आगार प्रशासनाने पोलीसांच्या बंदोबस्त चार एसटी सुरु केल्या होत्या.मात्र या एसटींवर नगावबारी परिसरात अज्ञात लोकांकडून दगडफेक करण्यात आली.यात चालक विजय भामरे जखमी झाले आहेत.मात्र याबाबत प्रशासन माहिती देण्आस टाळाटाळ करत आहेत. पोलीसांच्या बंदोबस्तात सुरु करण्यात आलेल्या एसटींवर देखील दिडफेक झाल्याने नव्याने आलेल्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: