धुळे जिल्ह्यात आजपासून पाच दिवशीय ‘महासंस्कृती महोत्सवा’चे आयोजन; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांचे आवाहन

बातमी कट्टा:-राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागातर्गंत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अधोरेखित करुन विविध प्रांतातील संस्कृतीचे जतन, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्याची माहिती जनसामान्यापर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. या महोत्सवात महाराष्ट्राची हास्यजत्रा, आयुष्यावर बोलू काही, वारी-सोहळा संतांचा, मोगरा फुलला, शब्द सुरांची भावयात्रा यासारख्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यात 26 फेब्रुवारी ते 1 मार्च, 2024 या कालावधीत होणाऱ्या या पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवात ढोलताशा पथक, लेझिम पथक, कलशधारी मुली, कानुबाई देखावा, टिपरी नृत्य, वारकरी दिंडी, आदिवासी नृत्य, शिवकालीन शस्त्र कलेचे सादरीकरण, शहनाई तबला जुगलबंदी, शाहिरी शिवगर्जना, गीतगायन, वहीगायन, खान्देशी लोककला आणि आहिराणी लोकगीत, मराठी अहिराणी गीतगायन व नृत्य, भरतनाट्यम, व्यक्तीगत एकपात्री नाटक, काव्यमय संगीत कार्यक्रम, गोंधळ, पोतराज, पोवाडा, हिंगरी व जात्यावरची गाणी, मारुतीची जत्रा बालनाट्य, शाहीरी जलसा, हिंदी मराठी गाण्याची संगीतमय मैफिल, आपली मायबोली, खान्देशी अहिराणी गीते, वारी-सोहळा संत परंपरा, पंढरीच्या वारीची परंपरा आणि वारकरी संप्रदाय यावरील नृत्य नाटीका, मल्लखांब, जगणं तुमचं आमचं काव्यवाचन व गायन मैफिल, महाराष्ट्र दर्शन, अभंग, महाराष्ट्राची संत परंपरा, लावणी, अहिराणी नृत्य, मोगरा फुलला भक्तीमय संगीत कार्यक्रम , दिव्यांग विद्यार्थी कार्यक्रम, बाहुल्यांचे विश्व कटपुतली कार्यक्रम, बेलसर स्वारी नाट्य, कविसंमेलन, अरे संसार संसार कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारीत संगीत व नाट्यमय कलाकृती, तसेच मराठी हिंदी गझलांची भावगर्भ मैफिल इत्यादी भरगच्च कार्यक्रम पाच दिवस आयोजित करण्यात आले आहे.

या महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, बचतगट उत्पादन, वस्त्र संस्कृती दालन, छायाचित्र प्रदर्शन, तसेच बचतगट उत्पादनाचे दालनही पाहण्याची अभुतपूर्व संधी उपलब्ध होणार आहे.

या महोत्सावातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांना प्रवेश विनामुल्य आहे. तरी धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवात पाच ही दिवस सहभागी होऊन कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: