धुळे जिल्ह्यात चोरांचा हैदोस ! जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोड्या !!!

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात चोरांनी हैदोस घातला असून जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी,धुळे शहरात आणि शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील घरांना टार्गेट करत चोरांनी सोने चांदीचे दागिन्यांसह रोकड असा लाखोंचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

धुळे जिल्ह्यात चोरांनी धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातील धुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरांनी घरफोडी करत लाखोंचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे तीन ठिकाणी चोरांनी घरफोडी केली असून यात घरमालक आणि चोरांमध्ये झटापट झाली आहे तर शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे देखील चार ठिकाणी घरफोडी केल्याची घटना घडली आहे. व धुळे शहरातील देवपूर भागातील शिक्षक कॉलनीत १५ तोळे सोने व १५ हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याने लाखोंचा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत. वेगवेगळ्या घटनेत चोरी झालेल्या ठिकाणी स्थानिक पोलीसांनी भेट देत चौकशी केली असून कारवाई सुरु केली आहे. मात्र चोरांनी संपूर्ण जिल्ह्यात घातलेला धुमाकूळ रोखण्यात पोलीसांना यश प्राप्त होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: