बातमी कट्टा:- धुळे शहराचे आमदार डॉ फारुख शहा यांनी आज भाजप नगरसेवक हिरामण गवळी यांच्या विरुध्दात गुन्हा दाखल केला आहे.महापालिकेत सभेत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहराचे एम.आय.एम पक्षाचे आमदार डॉ फारुख शाह यांनी आज भाजप नगरसेवक हिरामण गवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.धुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील कचरा ठेकेदाराकडून टक्केवारी हवी असल्याने आमदार अडचणी आणत असल्याचा आरोप गवळी यांनी पालिकेच्या सभेत केल्याबाबत प्रसार माध्यमात बातम्या आल्यानंतर आमदार डॉ फारुक शाह यांनी स्वतः फिर्याद दिली.बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात कलम ४९९ आणि ५०० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी महापालिकेचा भ्रष्ट कारभार आपण चव्हाट्यावर आणत असल्याने भाजप नगरसेवक गवळी यांनी असे आरोप केल्याचा दावाही आमदार शाह यांनी केला आहे.या आरोप प्रत्यारोपणामुळे मात्र धुळे शहराचे वातावरण ढवळून निघाले आहे.