
बातमी कट्टा:- आज पहाटे धुळ्याहून थेट आयोध्येला बस रवाना झाली. रामाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील पहिली एसटी बस अयोध्याला रवाना झाली असून बस रवाना होतांना फटाक्यांची आतिश बाजी करत जय श्रीरामांच्या घोषणा देण्यात आले होते.
बघा युट्यूब व्हिडीओ https://youtu.be/5ShMs4lC21o?si=kfFAtMIUBJ37tFLt
धुळे येथून आयोध्या येथे श्रीरामांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाची पहिली एसटी बस रवाना झाली.यावेळी प्रवाशांची गुलाबाचे फुले देऊन स्वागत करण्यात आले. यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पासून बुकिंग सुरू होते. पुणे, जळगाव ,नवापूर, पारोळा, अक्कलकुवा, अमळनेर येथील ४१ प्रवाशांनी सहभाग नोंदवला आहे.२८०० किलोमीटरचा हा प्रवास असून यासाठी दोन चालकांची नेमणूक करण्यात आले असून झाशी,प्रयागराज व आयोध्या तीन ठिकाणी मुक्काम करण्यात येणार आहे.जय श्री रामाच्या घोषणा देत प्रवाशांचा उदंड प्रतिसाद यावेळी बघायला मिळाला.एस टी महामंडळाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
युट्यूब व्हिडीओसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/5ShMs4lC21o?si=kfFAtMIUBJ37tFLt