नंदुरबार लोकसभा ,”उज्वला गॅस” वर शेकली ती “राजकीय पोळी” !

बातमी कट्टा:- “उज्वला गॅस” नंदुरबार लोकसभेत राजकारणातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हटला जाणारा विषय. नंदुरबार लोकसभेत गोरगरीब जनतेच्या घरातील चुलीवरील धुर दुर करण्यासाठी मोफत उज्वला गॅसच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य जपण्याचे कार्य केल्याचे सांगण्यात आले.मात्र खरच गोरगरीब जनतेच्या घरात वाटप करण्यात आलेला मोफत उज्वला गॅस सुरु आहे का ? की पुन्हा चुल्ह्यातून स्वयंपाक करण्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढावली आहे ? 

एक वेळा असा आला होता की देशात १ मे २०१६ साली मोफत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना सुरु करण्यात आली होती.या उज्वला गॅस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत होती. गरीबांना मोफत गॅस वाटप होत असल्याने गरीब जनतेच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत होते.घरात चुलीवर स्वयंपाक होत असल्याने आरोग्य,चुलीच्या धुरमुळे महिलांची दृष्टी खराब होऊ नये यासाठी मोफत उज्वला गॅस योजना सुरु करण्यात आली.यात सबसिडी देण्याचा घेण्यात आला.

नंदुरबार लोकसभा परिसरात तर मोठ्या प्रमाणात उज्वला गॅस च्या माध्यमातून प्रचार प्रसार करण्यात आला.एकेकाळी अशाच पध्दतीने जिओ कंपनीने केले होते.मोफत सिमकार्ड वाटप करुन व मोफत डेटा वाटप करुन प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये जिओ सिमकार्ड आले आणि त्यानंतर रिचार्जसाठी वाढलेली रक्कम आणि त्या माध्यमातून जिओ ने केलेला बिजनेस सर्वांना ज्ञात आहे.

अशाच पध्दतीने सुरुवातीला या उज्वला गॅस च्या माध्यमातून मोफत गॅस शेगडी वाटप करण्यात आली.आणि नंतर सुरु झाला तो “बिजनेस” ! गोरगरीब जनतेला गॅस भरतांना होणारा खर्च वाढत असल्याने अनेकांनी घरातील सिलेंडर भरणे बंद केल्याचे वास्तव कोणी नाकारु शकत नाही.यामुळे पुन्हा जैसेथे परिस्थिती निर्माण होऊन घरात चुलीवर स्वयंपाक सुरु झाला.आज कित्येक महिला उज्वला गॅस घरात असतांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत आहेत.कारण त्यांना सिलेंडर भरणे शक्य होत नाहीये.वाढत्या महागाईच्या काळात नंदुरबार लोकसभा क्षेत्रात मोफत गॅस वर फक्त आपली राजकीय पोळी शेकली गेली एवढ नक्की !

WhatsApp
Follow by Email
error: