
बातमी कट्टा:- नापीकीसह कर्जपणाला कंटाळून वयोवृद्ध शेतकरी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि 29 रोजी सकाळी घडली आहे.याबाबत पोलीस स्टेशनात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथील शेतकरी शेनपडु खंडू देवरे वय 67 यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल दि 29 रोजी सकाळी घडली आहे. शेतात दोन वेळा पेरणी केली पण पाऊस अभावी पेरणी वाया गेली.पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा पेरणी केली पण तीही वाया गेली यात डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगरामुळे ते नैराश्य होवून त्यांनी स्वतःच्याच घरी छताच्या सळईला दोर बांधून गळफास लावून घेत जीवन यात्रा संपवल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.
गळफास घेतल्याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तात्काळ दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्दकीय अधिकारी यांनी शेतकरी शेनपडु देवरे यांना मृत घोषीत केले.मांडळ येथील माधवराव विलास देवरे यांनी दिलेल्या खबरी वरून दोंडाईचा पोलीस स्टेशनात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.