
बातमी कट्टा:- महसूल विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या वाळू ट्रॅक्टर वरील दंड भरून देखील ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजारांची लाचेची मागणी करणाऱ्या शिरपूर प्रांत कार्यालयातील चालकासह खाजगी पंटरला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार तक्रारदार यांच्या अवैध वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टरवर डिसेंबर २०२३ साली महसूल विभागाने जप्त केला होता.या जप्त करण्यात आलेल्या वाळूच्या ट्रॅक्टर वर दंड आकारण्यात आला होता.सदर दंड तक्रारदार यांनी भरुन देखील ट्रॅक्टर सोडण्यास नकार देऊन २० हजारांची मागणी करण्यात आली.यात तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला तक्रार केली.या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची सहानिशा करुन तक्रारदाराकडे २० हजारांची मागणी करण्यात आल्याचे दिसून आले त्यावरून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खाजगी इसम आणि प्रांताधिकारी कार्यालयातील शासकीय चालक मुकेश विसपुते याला ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.