निर्दयीपणाचा कळस!रडण्याच्या आवाजाने डोके दुखू लागल्याने मामाने बालकाला ड्रम मध्ये टाकले..

बातमी कट्टा:- मोठ्याने रडत असलेल्या बालकाला डोके दुखू लागल्याने मामाने पाण्याने भरलेल्या ड्रम मध्ये टाकल्याने बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून अशी तक्रार बालकाच्या आईने पोलिस स्टेशनात दिली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील फिरदोस नगर मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मरियमबी बी.एजाज हुसेन रा.रातराणी चौक,मसूद मशिदीजनळ यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार मरियमम बी.एजाज हुसेन या त्यांच्या परिवारासह फिरदोस नगर येथे राहतात तर त्यांच्या आई,वडील भाऊ नुरुल अमीन नईम अहमद वय 22 हे देखील जवळच राहतात.मरियमबी हुसेन यांना मोहम्मद हमाद वय 5 व मोहम्मद हाजिक वय 4 ,वर्ष हे दोन मुले आहेत तर पती लॅबचे काम करतात.

मंगळवारी दुपारच्या सुमारा मरियमबी हुसेन या त्यांच्या दोन्ही मुलांसह आई वडिलांकडे गेले होते.यावेळी मरियमबी हुसेन या आई सोबत बोलत असतांना मोहम्मद हाजिक हा त्याचा मामा नुरुल अमीन नईम अहमद वय 22 याच्या सोबत खेळत होता.मात्र काही वेळानंतर बालकाचा आवाज येत नसल्याने आई मरियम यांनी शोधाशोध केली असता. मोहम्मद हाजिक हा बालक बाथरूममध्ये प्लास्टिकच्या ड्रममध्ये खाली डोके वर पाय अशा अवस्थेत पाण्यात दिसून आला.बाहेर काढले मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही.

यावेळी मरियमबी हुसेन यांनी त्यांचा भाऊ नुरुल याला बालकाच्या परिस्थिती बाबत विचारले तेव्हा नुरुल याने सांगितले की,मोहम्मद रडत होता त्याच्या रडण्याच्या आवाजाने माझे डोके दुखू लागल्याने मी त्याला ड्रम मध्ये टाकल्याचे सांगितले.मोहम्मद हाजिक याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मोहम्मद हाजिक या बालकाला मृत घोषित केले. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

WhatsApp
Follow by Email
error: