बातमी कट्टा:- नेहमी प्रमाणे विहीरीत पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलीचा विहीरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दि 3 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील सांगवी जवळील कालापाणी येथील ग्रामस्थ मागील 8 ते 10 वर्षांपासून पडक्या विहिरीतून पाणी भरत असतात. नेहमीप्रमाणे काल दि 3 रोजी दुपारी 13 वर्षीय सलोनी जयसिंग पावरा ही विहीरीतून पाणी भरण्यासाठी गेली होती.हंडा घेवून विहीरीत उतरून हंडा भरून बाहेर निघतांना पाय घसरल्याने सलोनीचा विहीरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत सलोनीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. सलोनी इयत्ता सहावी वर्गात शिक्षण घेत होती.या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.