
बातमी कट्टा:- 7 मे रोजी धुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडपात्र ११४४४ खटले ठेवले. तसेच दाखल पूर्व प्रकरने देखील ठेवण्यात आले होते. जुने खटले तडजोडीने निकाली काढणे त्यासाठी लोक आदालत एक प्रभावी माध्यम आहे.

लोक अदालत मध्ये वैवाहिक वादांचा सलोखा करून कौटुंबिक व्यवस्था टिकविण्याकरिता महत्वाचे पाऊल उचलले जाते. आज कौटुंबिक न्यायालय मध्ये दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या लताबाई व मच्छिंद्र यांच्या खटल्यांमध्ये तडजोड झाली. दहा वर्षापासून एकमेकांविरुद्ध न्यायालयात वेगवेगळे अर्ज तक्रारी केलेल्या दाम्पत्याने एकत्र येऊन पुन्हा सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतला. या पॅनलच्या पॅनल प्रमुख माननीय श्री एस सी पठारे जिल्हा न्यायाधीश, पॅनल सदस्य गंभीर बोरसे महाराज, एडवोकेट केवल नादोडे यांनी सदर दांपत्याला समजावल्यानंतर त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.कौटुंबिक न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्री देवेंद्र उपाध्ये व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. दीपक डोंगरे यांनी त्यांचा सत्कार केला.
