बातमी कट्टा:- गीधाडे तापी नदीपुलावरुन तीन जणांनी तापी नदीत आत्महत्या केल्याची घटना दुपारी घडली होती.शहादा तालुक्यातील लोंढरे येथील पती पत्नी व मुलगा या तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती आता प्राप्त झाली आहे. आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी नदी पुलावरुन एक महिला व दोन पुरुषांनी तापी नदीत आत्महत्या केल्याची घटना घडली होती.आत्महत्या करतांना एकाने बघितले असल्याचे सांगण्यात आले.गिधाडे तापी पुलावर एक विषारी औषधाची बाटली व एम.एच 18 .8334 क्रमांकाची बॉक्सर मोटरसायकल व चपल्ला आढळून आले.मात्र आत्महत्या करणारे कोण याचा काही एक तपास लागत नव्हता घटनास्थळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भावड,एस.सी.कोळी,प्रविण निंबाळे,किरण बागुल, गोपाल माळी आदी जणांनी या घटनेची येऊन चौकशी सुरु केली.यावेळी या घटनेचा उलगडा झाला आहे. मिळालेल्या माहिती नुसार शहादा तालुक्यातील लोंढरे येथील एकाच घरातील नथा बुधा वाघ (माळी) वय 56,त्यांची पत्नी सखुबाई नथा वाघ (माळी) 51 व मुलगा गोपाल नथा वाघ (माळी) वय 30 यांनी आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शहादा तालुक्यातील लोंढरे येथील एकाच घरातील पती पत्नी व मुलगा यांनी एकत्र गिधाडे तापी नदीत उडी घेत जिवनप्रवास संपल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.त्यांच्या आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजु शकलेले नाही.
