पळासनेर गावात आढळली दुर्मिळ “पाल”…!

बातमी कट्टा:- दुर्मिळ पाल बघुन नागरिक अचंबित झाले होते.जखमी अवस्थेत आढळलेल्या या पालीची माहिती प्रणीमित्रांना मिळाल्यानंतर ही पाल पश्चिम भारतीय “लेटर्ड गेको” नावाने ओळखली जात असल्याची माहिती प्राणिमीत्रांनी दिली.जखमी पालीवर उपचार करुन जंगलात सुखरूप सोडण्यात आले.

शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील जुने मार्केट यार्ड हद्दीत पश्चिम भारतीय “लेपर्ड गेको” ही दुर्मिळ पाल जखमी अवस्थेत आढळून आली.सातपुडा वन्यजीव संरक्षण समितीचे अध्यक्ष प्राणीमित्र लकी जगदेव आणि सहकारी प्राणीमित्र अरविंद जमादार, अंकित जैन,दीपक गिरासे,मयूर जाधव, निशिगंध पवार,प्रमोद शिरसाठ,प्रेम बिऱ्हाडे यांना ही पाल आढळून आली.”लेपर्ड गेको” नावाने ओळखल्या जाणाऱ्या ही पाल साधारणपणे पाच ते सात इंच लांब असते. बिबट्यासारखे रंग व पट्टे या पालीच्या अंगावर असल्यामुळे या पालीचे नाव ‘लेपर्ड गेको’ असे ठेवण्यात आले आहे.इतर पालींसारखी ही पाल सरपटत जात नाही तर या पालीच सरपटणे मगरी सारखे असल्याची माहिती प्राणीमित्र लकी जगदेव यांनी दिली.पळासनेर परिसरात पहिल्यांदाच अशी दुर्मिळ पाल आढळून आली आहे. जखमी अवस्थेत आढळल्यानंतर पालीवर उपचार करून सांगवी वनविभागाचे रेंज फोरेस्ट ऑफिसर आनंद मेश्राम सांगवी वन वनविभागचे कर्मचारी यांच्या सोबत जंगलात सुखरूप सोडण्यात आले.

WhatsApp
Follow by Email
error: