
बातमी कट्टा:- कापूस,गहू, ज्वारी,बाजरी हरभरा या पारंपरिक पिकांसह धुळे जिल्ह्यातील शेतकरी आता केळी पिकांचे देखील मोठ्या संख्येने उत्पन्न घेत आहेत.धुळे तालुक्यातील युवा शेतकऱ्याने आपल्या साडेचार एकरात पहिल्यांदाच केळी फळपिकाची लागवड केली आहे.त्यातील साडे हजार झाडांपैकी 405 झाडांमधून दहा टन केळी इराणला निर्यात झाली आहे.

धुळे जिल्ह्यात कापूस,गहू, ज्वारी,बाजरी,हरभरा या पारंपरिक पिकांसह आता सर्वत्र केळीचे उत्पन्न घेतांना शेतकरी दिसत आहेत.धुळे तालुक्यातील लामकानी येथील युवा शेतकऱ्याने तर पहिल्यांदाच लागवड केलेली केळी फळपिक ईराणला निर्यात झाली आहे.धुळे तालुक्यातील लामकानी येथील युवा शेतकरी योगेश नारायणसिंग राजपूत यांनी आपल्या साडेचार एकर क्षेत्रात दि.15 जून रोजी रेवा जीनाईन कंपनीचे साडेचार हजार केळी रोपांची लागवड केली होती.त्यांच्या या केळी पिकाला पोलन ऍग्रो मिनरल्स व धरती कृषी संवर्धन यांची वेळोवेळी मदत लाभत राहिली.

खतांचे पाण्याचे वेळोवेळी व्यवस्थित व्यवस्थापन केल्याने साधारणपणे एका घडाचे 27-28 किलो वजन या प्रमाणात भरत असल्याने पहिल्या तोडणीत साडेचार एकरातील साडेचार हजार झाडांपैकी 405 झाडांचे दहा टन उत्पादन निघाले आहे. कुटुंबांसमवेत शेतीत कष्ट करुन वेळोवेळी तञ्ज्ञांचा सल्ला घेऊन शेतकरी योगेश राजपूत यांनी केळी पिक उभे केले.यामुळे झाडांची चांगली वाढ होऊन एकसारख्या घडांचे उत्पादन मिळाले.स्थानिक बाजारपेठेत केळीला 6-7 रुपये दर मिळत असल्याने व निर्यातक्षम उच्च गुणवत्तेच्या केळीला 10 रुपये प्रतिकीलो भाव मिळत असल्याने योगेश राजपूत यांची केळी इराणाला निर्यात झाली आहे. पहिल्या तोडणीत 405 झाडांमधून केळीचे दहा टन उत्पादन मिळाले आहे.शेवटपर्यंत असाच भाव मिळाला तर साडेचार एकरात एकुण 60 ते 70 टन असा एकुण 6 ते 7 लाखांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित राहणार असल्याचे शेतकरी योगेश राजपूत यांनी सांगितले आहे.
