बातमी कट्टा:- असुविधांसह पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने संतप्त महिलांसह नगरसेवकाने पाणीच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले आहे.दिड वर्षांपासून पाणीटाकी असतांना त्यातून पाणी पुरवठा होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
धुळे शहरातील देवपूर परिसरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने एमआयएम पक्षाचे नगरसेवक सईद बेग यांच्या नेतृत्वात महिलांनी नवरंग पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.गेल्या दहा दिवसांपासून या भागांमध्ये पाणीपुरवठा झाला नसल्याने संतप्त नागरिकांनी नगरसेवकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले.यावेळी महापालीकेच्या ढिसाळ कारभाराविरुध्दात घोषणाबाजी करण्यात आली.