बातमी कट्टा:- मुरुम खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.घटनास्थळी पिंपळनेर पोलीस प्रशासन दाखल होत तिघांचाही मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहिती नुसार साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील इंदिरा नगर भागातील तीन शाळकरी मुलांचा दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नवापाडा शिवारातील जेबापूर रस्त्यालगत असलेल्या बिजासनी रो हाऊस जवळील टेकडी जवळील मुरूम खोदलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात हुझेप हुसेन मंसुरी वय ११वर्षे इयत्ता ५वी, आयान शफी शहा वय १२ वर्ष इयत्ता ६ वी व नोमान मुक्तार शेख व य १६ वर्ष इयत्ता १०वी ,या तिन्ही विद्यार्थी मुलांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला.त्यांच्या ईतर दोन मित्रांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पिंपळनेर पोलीस स्टेशन प्रशासनासह ग्रामस्थ दाखल होत तिघांनाही पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती.या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.