
बातमी कट्टा:- सिक्कीम येथील दुर्घटनेत शहीद झालेले जवान मनोज माळी यांच्यावर आज दि 9 रोजी सकाळी साश्रू नयनांनी धुळे जिल्ह्यातील वाघाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी देखील वाघाडी येथील शहिद जवान मनोज माळी यांच्या घरी कुटूंबीयांचे सांत्वन केले.
शहीद जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.धुळे जिल्हाधिकारी एनसीसी तुकडी,आजी-माजी सैनिक, प्रशासकीय अधिकारी, आमदार आणि विविध लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा अंतिमसंस्कार झाला.यावेळी फैरी हवेत झाडून मनोज माळी यांना मानवंदना देण्यात आली.यावेळी अंत्यविधीसाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वाघाडी येथे शहिद जवान मनोज माळी यांच्या प्रतिमेसमोर आदरांजली वाहली.शहीद जवान मनोज माळी यांच्या घरी आई वडीलांचे सांत्वन केले.
यावेळी तेथे उपस्थित भारतीय सैनिक यांच्याकडून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय सैन्य बाबत माहिती जाणून घेतली.कर्तव्यावर असतांना जवान मनोज माळी ज्या दरीत कोसळले तेथील घटनची माहिती यावेळी गिरीश महाजन यांंनी जाणून घेतली.त्यांच्या सोबत आमदार काशिराम पावरा,भाजपाचे तुषार रंधे,भुपेशभाई पटेल, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपचे बबन चौधरी,अरुण धोबी,लोटन कोळी आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.