
बातमी कट्टा:- शेतातील रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या डोक्यात फावड्याच्या दांड्याने वार करुन जखमी केल्यानंतर शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.संतप्त नातेवाईकांनी भर पावसात शेतकऱ्याचा मृतदेह साक्री पोलीस ठाण्याबाहेर ठेवून आक्रोश व्यक्त केला.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील नाडसे गावात शेतातील रस्त्याच्या वादात शेतकरी देविदास चैत्राम नेरकर यांच्या डोक्यात संशयताने फावड्याच्या दांड्याने जोरदार मार केल्याने जखमी झाल्याने शेतकरी देविदास नेरकर यांंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेत असताना उपचारादरम्यान अखेर जखमी शेतकऱ्याचा मृत्यू झाला.संतप्त नातेवाईकांनी भर पाऊसात शेतकऱ्याचा मृतदेह साक्री पोलीस ठाण्याबाहेर ठेऊन संबंधित संशयितांवर पोलिसांनी कृपादृष्टी दाखविल्याने ते अद्यापही फरार असल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला.
