पेट्रोल ओतण्याची धमकी अन् दुकान झाले सील

व्हिडीओ बघण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा

बातमी कट्टा:- अन्य दुकाने सुरु असतांना त्यांच्यावर शिरपूर नगरपालिका पथकाने कारवाई न करता फक्त ठरावीक दुकनदारांवर कारवाई करत असल्याचा आरोप करत शिरपूर येथील एका दुकानमालकाने अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला होता.नगरपालिकेचे पथक आणि दुकानदारांमध्ये वाद झाला होता.पोलिसांच्या मध्यस्थीने संपूर्ण प्रकरण मिटवण्यात आला मात्र पथकाने दुकान सिल करत कारवाई केली आहे.

काल दि 15 रोजी दुपारी 4 वाजेनंतर नगरपालिकेचे पथक शिरपूर शहरातील पाचकंदील चौकात नियमाचे उल्लंघन करुन 4 वाजेनंतर दुकान सुरु असणाऱ्यांवर कारवाई करत होते.मात्र यावेळी नगरपालिकेचे पथक न्यु हातिमी सुपर मार्केट या किराणा दुकानावर जाऊन कारवाई करण्यासाठी पोहचली असता दुकानदाराने नगरपालिका पथकाला ईतर दुकाने सुरु असतांना फक्त ठराविक दुकानी बंद केले जातात,ठराविक दुकानांना पथक टार्गेट करत असतात असा आरोप अनेक व्यापारींनी घटनास्थळी केली.वारंवार कारवाई होत असल्याने कंटाळून दुकानदार हातिम केझार बोहरी याने अखेरदुकानाच्या बाहेर असलेल्या स्वताच्या दुचिकीतून पेट्रोल घेऊन स्वताच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला.यावेळी नगरपालिका पथकाचा आणि दुकानदाराचा दोन तास हा वाद सुरु होता घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.यावेळी घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस दाखल झाले होते.पोलिसांनी दुकानदाराला पोलीस स्टेशनात घेऊन गेले यामुळे व्यापारी संतप्त होत पोलीस स्टेशन पोहचले.या ठिकाणी पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला मात्र नगरपालिकेने दुकान सिल करत कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: