पेट्रोल पंपच्या कॅबिन मधून ५१ हजारांची चोरी,चोरी करतांनाचा व्हिडीओ सीसीटीव्हीत चित्रीत

बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- मध्यरात्रीनंतर पेट्रोल पंपावरील बंद कॅबिनच्या खिडकीची जाळी तोडून सुमारे ५१ हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना घडवी असून याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/Bt0kc9N_wQk

शिरपूर शहराजवळील शिरपूर फाटा येथे असलेल्या सी.आर.पेट्रोल पंपावर चोरीची घटना घडली असून सी.आर पेट्रोल पंपाचे कॅशीयर कृष्णा संजय मोरे यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले की,दि २३ रोजी रात्री १० वाजेपासून तर दि २४ रोजी सकाळी ८ वाजेपावेतो कॅशीयर कृष्णा संजय मोरे यांची पेट्रोल पंपावर ड्युटी होती.रात्रीचे सर्व कामकाज आटोपून कृष्णा पाटील हे दि २४ रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास कॅबीनचे लॉक लावुन झोपून गेले. सकाळी 6 वाजेच्या सुमारास कृष्णा पाटील यांनी झोपेतून उठून कामकाजाला सुरुवात केली असता यावेळी.टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेली पेट्रोल पंपाची ५१ हजारांची रोकड चोरी झाल्याचे समजले.यावेळी कॅबिनच्या मागे असलेल्या खिडकीची जाळी तुटल्याचे कृष्णा पाटील यांना दिसून आले.या घटनेबाबत शिरपूर पोलीसांना माहिती दिली असता घटनास्थळी पोलीसांनी चौकशी करत सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन संशयिताचे शोधकार्य सुरु केले आहे.

व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/Bt0kc9N_wQk

WhatsApp
Follow by Email
error: