पैसे चोरी करणाऱ्या संशयिताला पोलीसांनी शिताफीने घेतले ताब्यात,शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाची कारवाई..

बातमी कट्टा:- मध्यरात्रीनंतर पेट्रोल पंपावरील बंद कॅबिनच्या खिडकीची जाळी तोडून सुमारे ५१ हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना दि २४ रोजी पहाटेच्या सुमारास होती.सीसीटीव्ही फुटेजमधील व्हिडीओनुसार संशयिताचा शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे शोध पथक शोध घेत असतांना संशयिताला करवंद नाका परिसरातून ताब्यात घेतले आहे.

शिरपूर शहराजवळील शिरपूर फाटा येथे असलेल्या सी.आर.पेट्रोल पंपावर चोरीची घटना घडली होती.याबाबत सी.आर पेट्रोल पंपाचे कॅशीयर कृष्णा संजय मोरे यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीत म्हटले की,दि २३ रोजी रात्री १० वाजेपासून तर दि २४ रोजी सकाळी ८ वाजेपावेतो कॅशीयर कृष्णा संजय मोरे यांची पेट्रोल पंपावर ड्युटी होती.रात्रीचे सर्व कामकाज आटोपून कृष्णा पाटील हे दि २४ रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास कॅबीनचे लॉक लावुन झोपून गेले. सकाळी 6 वाजेच्या सुमारास कृष्णा पाटील यांनी झोपेतून उठून कामकाजाला सुरुवात केली असता यावेळी.टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेली पेट्रोल पंपाची ५१ हजारांची रोकड चोरी झाल्याचे समजले.यावेळी कॅबिनच्या मागे असलेल्या खिडकीची जाळी तुटल्याचे कृष्णा पाटील यांना दिसून आले.या घटनेबाबत शिरपूर पोलीसांना माहिती दिली असता घटनास्थळी पोलीसांनी चौकशी करत सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन संशयिताचे शोधकार्य सुरु केले आहे.

शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाकडून संशयिताचा शोध सुरु असतांनाच करण युवराज बागुल याने सदरचा गुन्हा केल्याबाबत पोलीसांना माहिती मिळाली.पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता संशयित करण युवराज बागुल हा करवंद नाका परिसरात मिळुन आला.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २७ हजारांची रोकड मिळून आली.चोरीच्या गुन्ह्याबाबत संशयित करण बागुल याने कबुली दिली.पोलीसांनी करण यास ताब्यात घेत २७ हजारांची रोकड व मोटरसायकल हस्तगत केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर, पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, शोध पथकाचे ललीत पाटील, लादुराम चौधरी, विनोद अखडमल,गोविंद कोळी, योगेश दाभाडे,मुकेश पावरा,प्रशांत पवार,मनोज दाभाडे,सचिन वाघ तसेच होमगार्ड मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी व आकाश पावरा आदींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: