
व्हिडीओ बघण्यासाठी फेसबुक लिंक वर क्लिक करा https://www.facebook.com/share/v/VnT3X2YAptq2EW7T/?mibextid=2JQ9oc
बातमी कट्टा:- शेतात दादर कापणीचे काम सुरु असतांना मजूरांना उग्र वास येऊ लागला त्यांनी समोर बघितले तर एका गोणपाटात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे दिसले.ते बघून सर्व मजूर घाबरले ते गावाकडे पळाले गावात ही घटना सांगितली आणि पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी पोलिसांनी ते गोणपाट उघडले तेव्हा धक्कादायक प्रकार उघड झाला त्यात मुलीची कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.अन् त्या मृतदेहावर असलेल्या कपड्यांवरून तो मृतदेह ७ ते ८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा असल्याचे उघड झाले. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरला घटनस्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले चौकशी करण्यात आली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु आहे.

फेसबुक व्हिडीओ साठी लिंक क्लिक करा https://www.facebook.com/share/v/VnT3X2YAptq2EW7T/?mibextid=2JQ9oc
दि ५ रोजी १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तीच्या वडीलांनी शिंदखेडा पोलिस स्टेशनात दिली होती.त्यात म्हटले होते की गावाजवळ मुलगा दुसऱ्यांच्या शेतात मजूरी काम करत होता त्याला जेवणाचा डब्बा देण्यासाठी मुलगी तेथे गेली मात्र डब्बा देऊन ती घरी परतलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेतला ती मिळुन आली नाही त्यामुळे तीचा अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार वडीलांनी दि ५ रोजी शिंदखेडा पोलिस स्टेशनात दिली.यानंतर तिचा पोलिसांकडून देखील शोध सुरु होता.सोनल मिडीयाच्या मदतीने नातेवाईक देखील त्या मुलीचा शोध घेत होते.

बघा फेसबुक व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/VnT3X2YAptq2EW7T/?mibextid=2JQ9oc
दि ११ रोजी शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावातील सादु वडार यांच्या शेतात दादर कापणीचे काम सुरु होते दुपारच्या सुमारास दादर कापणी दरम्यान उग्र वास येऊ लागला अत्यंत खराब वास येत असतांना त्यांना त्या दादरच्या शेतात एक गोणपाट दिसले त्यात कोणाचातरी मृतदेह असल्याचे त्यांना आढळले.ते बघून सर्वच मजूर भयभीत झाले आणि घाबरून गावात विरदेल गावात पळाले.त्यांनी गावात घटलेल्या घटनेची माहिती दिली.याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना संपर्क साधला पोलिस घटनास्थळी दाखल झाले.त्यावेळी शेतात असलेल्या ते गोणपाट फाडले तेव्हा त्यात मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे दिसून आले.
बघा फेसबुक व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/VnT3X2YAptq2EW7T/?mibextid=2JQ9oc
याबाबत त्या मृतदेहाच्या कपड्यांवरून सदर मृतदेह हा दि ५ रोजी बेपत्ता झालेल्या त्या मुलीचा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल केले.घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिंदखेडा पोलिस प्रशासनासह फॉरेन्सिक पथक दाखल झाले रात्रभर त्यांनी घटनास्थळी तपासणी केली.याप्रकरणी त्या मुलीच्या वडीलांनी शिंदखेडा पोलिस स्टेशनात खूनाचा गुन्हा दाखल केला.या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्याकडे आहे.
https://www.facebook.com/share/v/VnT3X2YAptq2EW7T/?mibextid=2JQ9oc
याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी या खूनामागे मोठ्या मुलीचा पती यांचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केल्याने याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. घटनेनंतर पोलिसांकडून शेतात व चौफेर तपास करत आहेत. हा खून कोणी व का केला हे पोलिस तपासात उघड होईलच मात्र अत्यंत क्रुरतेने हा खून केला असून गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह गोणपाटात टाकून दादरच्या शेतात फेकला असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना संशय आहे.
https://www.facebook.com/share/v/VnT3X2YAptq2EW7T/?mibextid=2JQ9oc