बातमी कट्टा:- मोटरसायकल चोरी करणाऱ्या तीन संशयितांना पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेत 1 लाख 50 हजार किंमतीच्या सहा मोटरसायकली त्यांच्या कडून हस्तगत करण्यात आले आहेत.पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार दि 31 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पथक मुंबई – आग्रा महामार्ग क्र 3 वरील लब्बैक चहा हॉटेल जवळ पोहचले असता पोलीसांना बघून 3 इसम मोटरसायकली वर बसुन पळण्याच्या बेतात असतांना त्यांच्यावर संशय आल्याने पोलीसांनी तिघांना जागीच पकडले त्यांचे नावे विचारले असता असलम शेख अय्युब रा.तिरंगा चौक धुळे,कपिल अन्सारी शकील अहमद रा.मौलवी गंज धुळे,शोएब शेख कलीम कमली रा.गफ्फुर नगर वडजाई रोड धुळे असे सांगितले ताब्यातील मोटरसायकली बाबत विचारपूस केली असता तिघांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्या तिनही मोटरसायकल चोलीच्या असल्याने मोटरसायकली जप्त केले.त्या तीनही संशयितांकडून 1 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या एकुण 6 मोटार सायकली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक संदिप पाटील, पोसई योगेश ढिकले,अजिज शेख,कैलास वाघ पांडुरंग नंदाळे,भुरा पाटील,संदिप कढरे,बाळासाहेब डोईफोडे,हेमंत पवार,शरद जाधव,स्वप्निल सोनवणे आणि सोमनाथ चौरे आदींनी केली आहे.