
बातमी कट्टा:- दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपूर बाळदे येथे यत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यासंदर्भात शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी आज मंदीर परिसराची पाहणी केली.

आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या बाळदे येथील मंदीरात लाखोंच्या संख्येने भावीक दर्शनासाठी येत असतात.एक दिवसासाठी यात्रोत्सव भरत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी येथे होत असते.या अनुषंगाने पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी बाळथे येथील मंदीर परिसराची पाहणी केली.
यावेळी पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी दि १७ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपूर बाळदे येथील यात्रोत्सव बाबत उपाययोजना व मंदीर आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे संदर्भात माहिती जाणून घेत कायदा सुव्यवस्था व वाहतूकी संदर्भात सुचना देण्यात आले.
