बातमी कट्टा:- प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशी निमीत्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.लाखो संख्येने भावीक प्रती पंढरपूर बाळदे येथे दर्शनासाठी दाखल होत असतात.
शिरपूर तालुक्याचे माजी आमदार संभाजीराव पाटील यांनी ट्रस्टच्या माध्यमातून विठ्ठल रूक्मिणीचे भव्य सुबक मंदिर उभारले आहे.आषाढी एकादशी निमीत्त मोठ्या प्रमाणात यात्रोत्सवाचे आयोजन मंदीर परिसरात करण्यात येत असते. कोरोनामुळे दोन वर्षांपासून येथील यात्रा बंद होती.यंदा यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने भावीक मंदीरात दर्शनासाठी पोहचणार आहेत.जिल्ह्यातून येणाऱ्या दिंड्यांसाठी मंदिर परिसरात मंडप उभारण्यात आला आहे. परिसरात दुकानांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शिरपूर आगारातून प्रती पंढरपूर बाळदे येथे येण्यासाठी जादा बसेस सोडण्यित येणार आहे.भावीक स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांगांची सोय करण्यात आले आहे. पहाटे महापूजा,काकड आरती, अभिषेक आदी कार्यक्रम होतील. रात्री किर्तनाचा कार्यक्रम होणार असून संस्थानाचे अध्यक्ष संभाजीराव पाटील सचिव निंबा पाटील व संचलकांनी संयोजन केले आहे.