प्रेयशीचे मुंडके छाटून प्रेमप्रकरणाचा झाला शेवट…पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना घेतले ताब्यात

बातमी कट्टा:- पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदी पुलाखाली महिलेचा मुंडके छाटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.धड होते मात्र मुंडके नव्हते.महिलेच्या हातावर फक्त ममता गोंधलेले होते.तर महिलेच्या अंगावर चांदीचे दागिने होते.पोलिसांकडून शोध सुरु असतांना चांदीच्या दागिन्यावर असलेल्या कोडवरुन शोध सुरू झाला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील सोनाराच्या दुकानावर पोहचले दागिने दाखवल्यानंतर सोनाराने दागिने त्यांच्या दुकानातील असल्याचे सांगितले. 

बघा व्हिडीओ लिंक https://youtu.be/az1giY5ylHw?si=dIE7sKTiewtfFs-m

यावरुन महिला शिरपूर तालुक्यातीलच असल्याचे पोलिसांना विश्वास बसला पण तालुक्यातून ममता नावाची ती महिला कोण याबाबत शोध घेण्यासाठी पोलिसांनी अखेर शिरपूर तहसील कार्यालयातून तालुक्यातील मतदार यादी घेतली त्यातील ममता नावाच्या महिलांचा पोलिसांनी शोध सुरु केला. तालुक्यातील पोलिस पाटीलांची बैठक घेऊन गावात ममता नाव असलेल्या महिलांबाबत माहिती घेण्यास सांगितली यात शिरपूर तालुक्यातील लाकड्याहनुमान गावातील महिला बेपत्ता असल्याचे उघड झाले. खून झालेली महिला लाकड्याहनुमान येथील असल्याचे उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी तपास फिरवला अन् तीचा प्रियकर आणि शिरपूर तालुक्यातील एकाने संगमत करुन महिलेला पालघरला नेत तेथे खून केल्याचे उघड झाले.

व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/az1giY5ylHw?si=dIE7sKTiewtfFs-m

दि.०७ फेब्रुवारी २०२४ रोजी मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील कारेगांव शिवारात खोडाळा ते कसारा जाणारे रोडवरील वैतरणा नदीवरील पुलाखाली अनोळखी स्त्री वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे हीचे मुंडके कोणत्यातरी धारधार शस्त्राने धडा वेगळे करुन ते पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने पुलावरुन खाली टाकुन जिवे ठार मारल्याचे उघड झाला होता.याप्रकरणी मोखाडा पोलीस स्टेशन येथज भा.दं.वि.सं.कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

व्हिडीओ बातमीसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/az1giY5ylHw?si=dIE7sKTiewtfFs-m

पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले.महिलेचा शोध घेण्याचा सर्वत्र प्रयत्न घेण्यात आला मात्र सदर पथकाने मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पोलीस ठाणे यांचेशी संपर्क केला. परंतु मयत महिलेची कोणतीही माहिती प्राप्त झाली नव्हती.

बघा व्हिडीओ https://youtu.be/az1giY5ylHw?si=dIE7sKTiewtfFs-m

मयत महिला हिच्या उजव्या हातावर ममता असे नाव गोंदलेले होते तसेच पायामध्ये चांदीचे जोडवे त्यावर SDS असा मार्क होता.शोध सुरु असतांना मार्च महिन्यात मयत महिलेल्या पायातील जोडव्याआधारे माहिती प्राप्त केली असता सदरचे जोडवे हे शिरपुर जिल्हा धुळे येथील SDS (सुधाकर दिपचंद सोनार) दक्षा ज्वेलर्सचे मालक यांचेकडे तयार केल्याचे व ते पावरा समाजाचे महिला वापरत असल्याचे निष्पन्न झाल्याने मार्च महिन्यात पालघर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरपूर तालुक्यात आले त्यांनी दिक्षा ज्वेलर्स यांना दागिन्यांचे फोटे दाखवले असता दागिने त्यांच्या दक्षा ज्वेलर्स मधील असल्याचे सांगण्यात आले.

बघा व्हिडीओ https://youtu.be/az1giY5ylHw?si=dIE7sKTiewtfFs-m

यावरुन खून झालेली महिला शिरपूर तालुक्यातील असल्याचे पोलिसांना विश्वास बसला पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपुर तालुक्यातील मतदार यादी तपासली असता सुमारे ४४५ ममता नाव असलेल्या महिला यांची यादी संकलीत केली. शिरपूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची बैठका घेतल्या सदर बैठकामध्ये त्यांना गुन्हयातील हकिकत सांगीतली व त्या भागातील पोलीस पाटील यांचे वॉटसअप ग्रुप तयार केले व त्यावर गुन्हयाची शोध पत्रीका पाठवुन त्यादवारे माहिती घेतली असता मयत ही शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले, त्याअनुषंगाने अधिक माहिती प्राप्त केली असता यातील मयत महिला व आरोपी सुनिल उर्फ गोविंद यादव यांचेत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले.

बघा व्हिडीओ https://youtu.be/az1giY5ylHw?si=dIE7sKTiewtfFs-m

त्यानुसार तांत्रिक व गोपणीय माहितीच्या आधारे आरोपी सुनिल उर्फ गोविंद यादव वय ४५ वर्षे रा. सोलापुर मूळ रा. खेंचा ता. जि. महाराजगंज राज्य उत्तरप्रदेश यास सोलापुर येथुन व शिरपूर तालुक्यातील बोराडी ता.शिरपूर जि धुळे येथून महेश रविंद्र बडगुजर उर्फ विक्की वय ३१ वर्षे यास त्याचे राहते ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले. 

पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीतांकडे यांच्याकडे कसून चौकशी केली असता सदर मयत महिलेचा आरोपी सुनिल उर्फ गोविंद यादव यास लग्न करण्यास व प्रॉपर्टी नावावर करून देण्यास बळजबरी करत होती. त्यावरून त्यांच्यात वाद होऊन सुनिल उर्फ गोविंद यादव याने महेश रविंद्र बडगुजर उर्फ विक्की याच्याशी संगनमत करून मयत महिलेस लोणावळा येथे फिरावयास जायचे आहे असे सांगुन तिस सोबत घेऊन इर्टीगा गाडीने पालघर जिल्ह्यातील मौजे कारेगावचे हद्दित आणून तिचा रुमालाने गळा आवळून जिवे ठार मारून तिचा खून करून तिचे मुंडके धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने वैतरणा नदीवरील पुलाखाली आणून टाकल्याचे आरोपीने कबुल केले आहे.

गुन्ह्याचा अधिक तपास हा गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग हे करीत आहेत.सदरची कारवाई ही बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल विभुते आदींनी केली आहे.

बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/az1giY5ylHw?si=dIE7sKTiewtfFs-m

WhatsApp
Follow by Email
error: