
बातमी कट्टा:- लहानपणापासून देशाच्या संरक्षणासाठी देशसेवेत भारतीय जवान बनण्याची हरपाल राजपूत यांची ईच्छा पुर्ण झाली. जम्मु कश्मीर सारख्या खडतळ ठिकाणी त्यांनी देशसेवा करत आहेत.हरपाल राजपूत यांचा विवाह ठरला.यावेळी त्यांच्या लग्नासाठी सजावट केलेल्या वाहनाची मात्र आता सर्वत्र कौतुक होत आहे.

तामथरे ता शिंदखेडा येथील भारतीय जवान हरपाल गिरासे यांचे मालेगांव तालुक्यातील पळासदरे येथे विवाह होता.मात्र हरपाल राजपूत यांच्या वाहनाची सजावट मात्र सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला. नवरदेवाला घेऊन जाण्यासाठी जे वाहन असते ते वाहन वेगळ्याच पध्दतीने सजावट केल्याने सर्वच जणांना हरपाल राजपूत यांच्यावर गर्व झाला.वाहनाची खूप छान सजावट केलेली होती.वाहनाच्या सर्व बाजूला देश सेवेबद्दल प्रेम व शेतकरी राजा बद्दल आदर हा संदेश सगळे युवकांसाठी त्यांनी दिला होता.या नवरदेवाच्या वाहनाच्या सजावटीसाठी नारायण गिरासे देगांव, भूषण जमादार खर्दे मातोश्री इव्हेंट दोंडाईचा, राजेंद्र गिरासे, समाधान गिरासे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
