बातमी कट्टा:- नंदुरबार तालुक्यातील भालेर शिवारातील आश्रमशाळेच्या बाजूला शेताच्या बांधालगत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळुन आला होता.रात्रीच्या सुमारास मिळुन आलेल्या त्या मृतदेहाचा खून झाला होता की आणखी दुसर काही हे काही एक समजायला मार्ग नव्हता.हा मृतदेह कोणाचा आणि खून कोणी कशासाठी केला ? याबाबत कुठलाही ठोस पुरावा पोलिसांना घटनास्थळी मिळुन आला नव्हता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने,रेल्वे स्टेशन, परिसर, परिसरातील गावांमध्ये फोटो दाखवत ओळख पटविण्याचा प्रयत्न केला मात्र काही एक माहिती मिळु शकली नव्हती.

नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशन येथे चार जणांनी मित्र हरवल्याची नोंद केली असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तात्काळ चौकशी केली असता,हावडा एक्स्प्रेसने पश्चिम बंगालमधील पाच जण गुजरातमधील भरुच येथे मजुरी करण्यासाठी जात असतांना एक तरुण नंदुरबार रेल्वे स्टेशनवर उतरून हरवला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली पोलीस पथकाने तात्काळ भरुच येथे जाऊन त्या चार जणांचा ठिकाणा गाठून मयत व्यक्तीचा फोटो दाखवला त्यावेळी त्या चारही जणांनी मयत व्यक्तीला ओळखले,व नंदुरबार रेल्वे स्टेशन वरून हाच हरवला होता अशी माहिती पोलिसांना दिली.दिपक सुकरा उराव वय 26 रा शिमनलेन, पश्चिम बंगाल असे मयत व्यक्तीचे नाव उघड झाले.पोलिसांना मयत व्यक्तीची ओळख पटली होती मात्र खून कोणी व का केला आणि ते पण अशा ठिकाणी कस काय खून झाला असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला होता.

यावेळी पथकाकडून तपास सुरू असतांना गोपणीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे पथकाने भालेर येथील भिका गेंदल पाटील वय 26 याला ताब्यात घेतले संशयित भिका पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असतांना पोलीस हिसका दाखवल्यानंतर संशयित भिका पाटील याने पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली,दि 25 रोजी रात्री 9 -9:30 वाजेदरम्यान भिका पाटील हा प्रकाश हिरामण पाटील, मुकेश गेंदल पाटील यांच्या सोबत मोटारसायकलीने भालेर येथुन नंदुरबारकडे जात असतांना एका अनोळखी व्यक्ती (मयत दिपक उराव) यांच्यात वाद झाला तिघांनी लाकडी दांडका दगडने मारहाण सुरु केल्याने अनोळखी व्यक्ती मयत दिपक हा आश्रमशाळेच्या बाजुस शेतात पळाला तिघा संशयितांनी दिपकला तेथे गाठून डोक्यात लाकडी दंडा टाकत गळा आवळून त्याचा खून केल्याची कबुली भिका पाटील याने पोलिसांना दिली.पोलिसांनी तात्काळ प्रकाश पाटील आणि मुकेश पाटील या दोनही संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले आहे.