बातमी कट्टा:- शेतात सोने सापडले आहे ते विकत घेण्याची विनंती केल्यानंतर 4 लाख रुपये घेऊन दिड किलो बनावट सोन्याचे ओम पान देऊन पसार झालेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे.त्यांच्या ताब्यातील 6 लाख 67 हजार रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि 30 रोजी दिपक प्रभाकर भामरे रा.पिंपळनर यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली होती त्यात म्हटले की,दि 28 रोजी दिपक भामरे हे त्यांच्या प्रथमेश ट्रेडर्स नावाच्या दुकानात बसले असतांना त्यांना अनोळखी इसमाने तेथे येवुन त्याच्याकडे असलेले सोन्याचे पदक दाखवुन त्यास पैशाची गरज आहे असे सांगुन सोने खरेदी बाबत विनंती केली. त्यानुसार दिपक भामरे यांनी सदर सोन्याची खात्री केली असता ते खरे असल्याची दिपक भामरे यांना खात्री पटली.त्यानंतर त्या अनोळखी इसमासोबत चर्चा केल्यानंतर सदर अनोळखी इसमाने स्वाचे नाव दिपक भामरे यांना राजु मिस्तरी सांगितले. त्यास शेतामध्ये सोने मिळाले आहे असे सांगून ते विकत घेण्याची विनंती केल्याने दिपक भामरे यांनी होकार दिला.व दि 30 रोजी साक्री येथे बोलवून दिपक भामरे त्यांच्या कडून 4 लाख रुपये घेऊन त्यांना दिड किलो बनावट सोन्याचे ओम पान देवून तेथून पसार झाला.
यापूर्वी दि 29 रोजी पंकज हिरामण गंगावणे रा.अलियाबाद ता.सटाणा जि.नाशिक यांच्याकडून सुध्दा सदर अनोळखी इसमाने रुपये 2 लाख 50 हजार घेवून त्यांना बनावट सोने देवुन त्यांचीही फसवणूक केली होती.वरील दोन्ही घटने संदर्भात पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचे तक्रारदार हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यानंतर सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी खात्री करून त्यांना सदर अनोळखी इसम हे धुळ्याचे दिशेने गेल्याची माहिती भेटली असता,त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना माहिती कळवली त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथक धुळे शहरात व आजुबाजुच्या परिसरात वर्णन दिलेल्या इसमांचा शोध घेत असतांना साक्री बायपास रोडवरील भंडारा हॉटेलच्या पाठीमागे काही लोक नव्याने पाल टाकून तेथे राहण्यास आले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकला असता दोन संशयित तेथून पसार झाले तर दोन जण पोलीसांच्या ताब्यात सापडून आले.त्या दोघांनी स्वताचे नाव जितेंद्रकुमार लालारामजी वाघोला वय 35 धंदा मजुरी रा.पंचायत वाली गली बागरा तहसील जि.जालोर राजस्थान व मांगीलाल हिराराम वाघरी वय 42 धंदा मजुरी रा. बागरीयो का वास सिवणा तहसील जि.जालोर राजस्थान असे सांगितले दोघांकडून 6 लाख 46 रुपये रोख रक्कम तसेच पिवळ्या रंगाचे धातुचे ओम वजन 1 किलो 632 ग्रँम पिवळ्या रंगाचे 964 ग्रँम धातुची माळ,इलेक्ट्रीक वजन काटा त्यावर प्रोक्झी व पिआर 40 असे लिहीलेले असे एकुण 7 मोबाईल हँन्डसेट व इतर रोख रक्कमसह 6 लाख 67 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत ,सपोनि सचिन साळुंखे,दिलीप खेडकर,सुशात वळवी,प्रभाकर बैसाणे,रफिक पठाण,अशोक पाटील, संदीप सरग गौतम सपकाळे, राहुल सानप,मयुर पाटील, तुषार पारधी, श्रीशैल जाधव,सुनील पाटील, मनोज महाजन ,कविता देशमुख,भुषण वाघ,रविंद्र सुर्यवंशी आदींनी केली आहे.