बातमी कट्टा:- बस स्थानकातील बसमध्येच बस चालकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि 6 रोजी रात्री रात्रीच्या सुमारास घडली आहे.आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.घटनास्थळी पोलीस आणि एसटी प्रशासन दाखल झाले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे येथील बस स्थानकात हिरमण देवरे या बस चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुणे – धुळे बस मध्ये घंटी वाजवायच्या दोरीच्या साह्याने बसमध्येच गळफास लावत आत्महत्या केली आहे.हिरामन देवरे हे पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकात चालक म्हणून कार्यरत होते. आत्महत्येची माहिती सर्वत्र पसरताच बस स्थानकात खळबळ उडाली.घटनास्थळी पोलीस आणि एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरु होती.