बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासण घाटाच्या वरच्या बाजुस मध्यरात्री दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने दरड कोसळले तेव्हा कुठलेही वाहन त्या ठिकाणी नव्हते.मध्यप्रदेश पोलीसांनी सकाळी हा रस्ता मोकळा केल आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सातपुडा डोंगर माथ्यावरील बिजासण घाटाच्या वर मध्यप्रदेश व महाराष्ट्र सिमा दरम्यान मध्यरात्री अचानक दरड कोसळली सुदैवाने यावेळी एकही वाहन याठिकाणा रस्त्याकडून जात नव्हते.येथील दरड कोसळल्याने इंदौरकडील संपूर्ण रस्ता बंद झाला होता.यामुळे मध्यप्रदेश पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक वळवून एकाच बाजूने वाहने पाठविण्यात आली होती. पाऊसाचा दिवसेंदिवस जोर वाढतांना दिसत आहे.याठिकाणी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 हा सातपुडा डोंगराच्या जवळून गेला आहे.दरड कोसळल्याने शिरपूरकडून इंदौर कडे जाणारा मार्गावर मातीचा ढिग पडला होता यामुळे पुर्णता रस्ता बंद झाला होता. आज सकाळी मध्यप्रदेश पोलीसांनी हा रस्ता कॉकलेन मशीनच्या साहाय्याने मोकळा केला आहे.