बातमी कट्टा:- अनेक दिवसांपासून दक्षशत निर्माण केलेल्या बिबट्याने आज पुन्हा दोन बोकड व शेळीचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे.बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

साक्री तालुक्यातील उंभरे येथील परिसरात काही दिवसांपासून बिबट्याची दहशत बघावयास मिळत आहे.या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. उंभरे येथील शेतकरी संजय देवरे यांच्या शेतात पहाटेच्या सुमारास बिबट्याने दोन बोकड व शेळीचा फडशा पाडल्याचे उघड झाले आहे.यात देवरे यांचे तब्बल 20 हजारांचे नुकसान झाले आहे. वन विभागाने तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी देवरे यांनी केली आहे. परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून वन विभागाने तात्काळ त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे,तर वनरक्षक चव्हान यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
