बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय बालकाचा मृत्यू..

बातमी कट्टा:- रात्रीच्या सुमारास अंगणात बसून जेवण करत असतांना बिबट्याच्या हल्ला करत शेतात ओढन नेले व लचके तोडले.यात सात वर्षीय बालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर वनविभाग पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.या घटनेमुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील सुरेश  भाईदास वसावे हा सात वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात सुरेश वसावे या बालकाचा जागीच मृत्यू झाला. सुरेश वसावे हा जेवण करण्यासाठी घराबाहेरील अंगणात बसला होता.यावेळी त्याच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करत सुरेशला बिबट्याने फरपटत मागच्या बाजूला शेतात घेऊन जात कमरेखालील भागाचे लचके तोडल्याने सुरेश वसावे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेनंतर मयत सुरेशच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

गेल्या दोन महिन्यांपासून येथील भागात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ चिंतेत असतांंना या बिबट्याने नागरिक वस्तीत आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे बिबट्याला तात्काळ जेरबंद करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: