
बातमी कट्टा:- 26 मार्च 2025 रोजी शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावालगत असलेल्या शेतात शेडवर बांधलेल्या 2 शेळ्यांना पहाटे बिबट्याने हल्ल्यात ठार केल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की, जैतपूर येथील शेतकरी नंदूसिंग उत्तमसिंग राजपूत या शेतकऱ्याच्या शेतात शेडवर शेळ्या बांधलेल्या होत्या दिनांक 26 रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या या वन्य प्राण्याने शेडवर बांधलेल्या शेळ्यांना उचलून नेत नाल्यालगत त्यांना फस्त केली. वन्य प्राण्यांनी शेळ्यांना ठार केल्याची माहिती परिसरात पसरल्यानंतर शेतकर्यांनी शिरपूर वनविभागाला माहिती दिली. शिरपूर वन विभागाचे टीम व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्या सदृश्य वन्यप्राण्यांचे पायाचे ठसे व मृत शेळ्यांची पाहणी करून मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करून पुढील कार्यवाही सुरू आहे. संध्याकाळी घटनास्थळी वनविभागाच्या पथकाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून व रात्री गस्त वाढविण्यात आली आहे. आज दिनांक 27 मार्च 2025 रोजी पहाटे गावालगत बिबट्या ग्रामस्थांच्या पाहण्यात आला.
पुन्हा आज सकाळी वनविभागाकडून जैतपूर, वाठोडे, पिंपरीसह तापी नदी काठालगतच्या परिसरात पाहणी सुरू केली.2 शेळ्यांना ठार केल्याची माहिती परिसरात समजल्यावर ग्रामस्थ व शेतकरी, मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनपाल कपिल पाटील, वनपाल दीपिका पालवे, वनरक्षक व वनमजूर यांचेकडून परिसरात जनजागृती केली जात आहे. तरी शेतकरी, मजूर व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
