बोरकुंड-मांडळ रस्त्याच्या कामास प्रारंभ,1 कोटी 58 लक्ष रुपयांचा निधी

बातमी कट्टा:- आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या धुळे तालुक्यातील बोरकुंड ते मांडळ रस्त्याच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी सुमारे 1 कोटी 58 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने धुळे तालुक्यातील रस्ते विकासासाठी विविध विभागामार्फत निधी प्राप्त करुन सदर रस्त्याच्या कामांना गती देण्याचे काम केले जात आहे. त्या अनुषंगाने आज दि.7 ऑगस्ट रोजी मांडळ ता.धुळे येथे आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते मांडळ ते बोरकुंड या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, धुळे तालुक्यासह शिरुड बोरकुंड परिसरातील रस्तेच्या कामांना प्राधान्य देत शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या दळणवळणाच्या सोयी सुविधा सोयीस्कर करण्यासाठी प्रयत्न असतो. त्याच प्रमाणे टप्प्या टप्प्याने बोरी नदीवरील पुलांच्या कामांच्या मंजुरीचा पाठपुरावा करुन त्यांना मंजुरी देण्याचे काम केले जात आहे. लहानसहान प्रश्‍नांसही तळागावातील माणसाच्या समस्या सुटाव्यात म्हणून नेहमीच लक्ष केंद्रीत केले जात असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब भदाणे, माजी जि.प.सदस्य देविदास माळी, ज्येष्ठ नेते सी.यु.पाटील, संतोष पाटील,  तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, डॉ.संदिप पाटील, पं.स.सदस्य गोकुळ माळी, पप्पू पाटील, भाऊसाहेब पाटील,राजु मराठे, रवि माळी, डॉ.राजेंद्र माळी,शालीग्राम माळी, हिंमत बाचकर, चंद्रकांत माळी,दिनकर पाटील,संभाजी माळी,दगडू माळी, छोटू पाटील,प्रभाकर माळी आदी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: