
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बोरगांव ग्राम पंचायत कार्यालयात एसव्हीकेएम फॉउंडेशन शिरपूर तर्फे डॉ आशू रत्र पंजाब यांच्या कडून मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले. ज्यात 61 ग्रामस्थांनी उस्फुर्त पणे सहभाग निंदविला ज्यातून 22 रुग्णांवर पुढच्या आठवड्यात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे व मोफत चष्मा देखील वाटप करण्यात येणार आहे.

माजी मंत्री श्री.अमरिषभाई पटेल, आमदार श्री. काशीरामदादा पावरा, शिरपूर शि. व. न. पा च्या नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष.भुपेशभाई पटेल, एसव्हीकेएम फॉउंडेशनचे उपाध्यक्ष .चिंतनभाई पटेल, भाजपा उपाध्यक्ष के. डी. पाटील, माजी नगरसेवक अशोक कलाल यांच्या नेतृत्वाखाली तसेच बोरगांव चे उपसरपंच तथा शिरपूर तालुका सरपंच महासंघ अध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या सहकार्याने आज मंगळवार दि 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यत बोरगांव ग्राम पंचायत कार्यालयात मोफत मोतीबिदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जि प सदस्य भरत पाटील, पं स सदस्य निंबा पाटील, बोरगांवचे उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, पोलीस पाटील मनोहर पाटील, ग्रा पं सदस्य दीपक राजपूत, माजी सरपंच रघुनाथ कोळी, सोसायटी चेअरमन खंडू झिंगा राजपुत, कौतिक न्हावी, हिरालाल चिंधा पाटील, हरी गबा न्हावी, गोलू धुडकू भिल तसेच महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोरगांव ग्रामस्थांनी माजी मंत्री श्री अमरिषभाई व श्री भुपेशभाई पटेल यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली व आमदार कार्यालयातील ‘विकास योजना आपल्या दारी’ टीम चे जाहीर आभार मानले.
