बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत व बोरगाव येथे विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.यावेळी गावातील उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की एकलव्या सारखे तुम्ही पण आपल्या शिक्षकांचे आदर्श शिष्य व्हा.ज्याप्रमाणे एकलव्याने गुरूने शिक्षा देण्यास नकार दिल्यावर सुद्धा आपल्या गुरूचा पुतळा बनवून रोज त्यापासून प्रेरणा घेऊन विद्या अवगत केली तसे आदर्श शिष्य बनण्याचा सल्ला उपसरपंचांनी दिला.
यावेळी बिरसा मुंडा व एकलव्याचा प्रतिमेचे पूजन उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राजू भिल यांच्या हस्ते करण्यात आले.मुख्याध्यापिका अनिता जाधव व शिक्षक गणेश पाटील यांनी एकलव्य व बिरसा मुंडांवर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, शालेय समिती अध्यक्ष राजू भिल, मुख्याध्यापिका अनिता जाधव, शिक्षक गणेश पाटील, धुडकू भिल, दिलीप गुलाब भिल, गोपीचंद भिल, शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष ईश्वर गुलाब भिल, भाईदास वना भिल, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.